Sunday 2 September 2012

हरिश्चंद्रगड ...माळशेज घाट आले फाटा मार्गे --खिरेश्वर तलाव

..............हरीश्चंद्र गड ......प्रवास
हि ट्रीप अगोदर ठरवली होती .माझ्या मनात एक विचार आला कि राज बरोबर नाईट वॉककरायचा आणी तो पौर्निमेच्या  रात्री ...जंगलातून ......पुण्यात असा स्पॉट दिसेना ...आणी मी कधीतरी कोकण कड्याचे फोटो पहिले होते .म्हणून हरीस्चान्द्रा गड ठरवला ,,,पण लोक म्हणाले तो अवघड आहे ..सध्या राजगड ला जाऊ .राजगड  करून आलो ...आणी मधेच ठरल कि ठीक आहे जाऊ ..त्या ची फरफट नको म्हणजे त्याला ज्यासाठी न्यायचा ते कारण बाजूला राहत ..आणी बाकी अडचणी जीव खातात म्हणून मी अगोदर जाऊन ययाच ठरवल ....प्रशांत ला बोललो तो एका पायावर तयार झाला .....सोम्या ...नाही हेम्या शश्या बाटलीचे हकदार ..चालायचं शक्यच नव्हत ..त्यांना खऱ्या परी राज्यात नेल तरी दरवाजा उघडणार नाहीत ...कशाला उगाच ..चालायचा त्रास ...(उचलून नेतोस का ?मग येतो...)मग हर्डीकर ला विचारल मालकांची इच्छा झाली तर त्यादिवशी ठरवू ...अमेय ला  विचारल तर ,त्या दिवशी त्याच्या मिटींग होती ...नंतर हार्डी तयार झाला ...अमेय पण हो म्हणाला रात्री काळाल  कि तो खरच २ दिवसांचा ट्रेक आहे ...अवघड असावा...पुण्यापासून १७० किमी लांब ..खिरेश्वर गावाजवळ अगोदर जंगलातून चालायचं त्या नंतर कडा चढायचा ..त्यानंतर पुन्हा चालायचं ७ किमी मग तिथल शंकराच देवूळ ..त्यापुढे कोकण कडा .गुगल अर्थ म्हणजे चित्र गुप्त सगळ्याच हिशोब ठेवतो .त्याची चोपडी बघितली ...इथ स्पेन सारख नाही कि कुठल्याही रस्त्यवर उतारा आणी पहा ....भारतातील  शहरे जाउद्यात पण अशा ठिकाणांसाठी तरी गुगल कॅमेरा ला परवानगी द्यावी ....मी पाहिलं  पुण्याहून  आळे फाटा ....तिथून माळशेज घाट ..धरण संपल्यानंतर नंतर धरणाच्या वाटेवरून गावात ,तिथून त्तोलर खिंड तिथून कडा तो चढल्यावर सपाट डोंगर वाटेत जराशी झाडी ......गुगलवर दाट  झाडी आणी विरळ झाडी अस काही दिसत नाही १०० मीटर उतार कळत नाही ....तो तोलार खिंडी नंतरचा रस्ता (झेड स्पॉट) एक बारीक पायवाट असेल असा मी समज करून घेतला ...जे कोणी नेट वर फोटो टाकले होते त्यात फार काही कळत नव्हते ...त्यामुळे ते फारच अवघड असेल अस वाटल नव्हत ....मध्ये कड्याच्या बाजूची वाट दिसत नव्हती   ...पुसली असेल ..असा सोयीस्कर गैरसमज करून घेतला ...................................................
रात्री अमेय ला सांगितलं कि लवकर निघायला हव १० वाजता ....हर्डीकर ने ट्रेकिंग च  सामान  विकत घेतलं ...नशीब शेर्पा विकत मिळत असता तर तो पण घेतला असता ..अमेयच पण असा प्रयत्न होता पण मी सांगितलं कि फक्त गरजेच समान ..कपडे नाही ..१ टोवेल ..खायला बिस्किटे ..झोपायला चादरी ...कॅमेरे ..बटरी .एकदम हलक ...हार्डी म्हणाला  अरे आपण जेवायचं पण घेवू म्हणजे दुपारच जेवण वाचेल ....ओके   घ्या ....तरीपण सुक्का मसाला सगल्यांनी  घेतला .....पाणी प्यायच्या   प्रत्येकी चार बाटली म्हणजे ४ किलो ..अत्यावशक होत .....................बुट ..बऱ्यापैकी ....गड अवघड म्हणजे किती असेल ?सिंहगड पेक्षा दुप्पट ....जमेल .........
..हार्डी म्हणतो चालन हे माझ काम  नाही मी १०२ किलो च माणूस ..मी त्याला म्हणल तुला चालायची इच्छा आहे कां ?हे अगोदर ठरव त्यानंतर तू ते करू शकतोस कि नाही हे बघुयात .....त्यान अगोदर सिंहगड चढला होता .....त्याच सगळ प्लानिग असत ...काही त्रास नको ....त्यान विचारल आपण राहणार आहे का? मी: -अजून ठरवल नाही ..आपण गडावर जाणार आहोत कि नाही हे पण निश्चीत नाही ......शनिवारी रहायचं ..रविवारी सकाळी पहाटे निघायचा संध्याकाळी परतायचं....जोपर्यंत नीट चालता येतंय तो पर्यंत तो पर्यंत चालायचं ......जीथ नको वाटेल तिथ थांबायचं ....पुढ निघाव वाटल तर निघायचं ४ मिनिट चालायचं आणी १५ मिनिट विश्रांती घ्यायची ....आपल चालन हेच उदिस्त्  आहे .गडावर पोचण हे नाही ..रमत गंमत सहज पणान ......................................................अमेय म्हणाला काय घ्याच ,काही नको फक्त पांघरूण आणी पाणी बिस्कीट .....पण मला जमणार का? मी—तुला या प्रोसेस मधून जायच्य का ? हे अगोदर ठरव ..मग पुढच बोलू ..मी व प्रशांत राजगड  चढलो होतो ..त्याचा स्टमिना मला माहित होता ....माझ्या मनातला जो कडा होता तो मी प्रशांत ला आणी हार्डी ला चढवू शकत होतो ....दादा ला सांगितलं ..(.माझा मुलगा—स्पार्टाकस )---आपण शनिवारी निघायचं आहे तू तुझी बाग भर  ...टे बजन तुला ८ किमी न्यायचा आहे ...जास्ती सामना बद्दल ---टे घ्यायचं  अस ठरल ---  टे गाडीत ठेवायचं आणी शेवटी वाटल तर घ्यायचं .....१० वाजता निघायचं ठरल ...मला काळाल कि जास्ती जास्त लवकर निघायला हव ..हार्डी ९ वाजता येणारा माणूस १० वाजले तरी आला नाही ...१० :४५ ला आला कारण त्याला स्लीपिंग बाग घ्यायची होती ......फक्त प्रवास च करायचा होता म्हणून चीड चीड होत नव्हती ...पण पठ्या खर कुठ सांगतोय .....ओक झाली सुरवात ...........हि सिटी हे एक कॅव्हर असत बाहेर ट्रीप ला निघाला कि टे टाकून दिल जात .....सो यु कॅन सी रिअल पीपल ....तो आला आम्ही निघालो ........अमेय ने जी  पी एस .  आणला होता ...आम्ही जे फोटो घेणार त्यावर त्याच गी पी एस लोकेशन येणार होत .हे माझ्यासाठी ...मला कळाल होत कि तो गड कसा  आहे हे आम्हाला अजून काळाल नव्हत .आणी ज्याला खूप डीटेल माहिती हवी त्याला टी मिळावी म्हणून मी फोटो काढणार होतो ....चाकण गेल मंचर गेल आले फाटा वर २ रस्ते एक जी पी एस दाखवत होता शोर्ट  आणी दुसरा लोकल लोक सांगत होते ....पुढ माळशेज घाट रस्त्याने निघालो ....वाटेत सुळक्याचा  डोंगर दिसला ..तिथून उजव्या  बाजूने खिरेश्वर ला जायला चांगला रस्ता आहे .पण मी विरोध केला जे सोप आहे टे निवडाव ताण  येत नाही .मग आम्ही तलावाच्या बंधाऱ्यावरून जायला निघालो ...हार्डी ने थांबवल ..का तर म्हणे कि त्याला टे योग्य वाटत नाही .....त्यावरून जीप जातात हे मला माहित होत  शेवटी गाडी घातली .....ऐश्वर्या हॉटेल ...तिथ पुण्याच एक ग्रुप होता ..तो निघाला होता आणी आम्ही पोचलो .२:४५ ..मी घाई केली कारण काही लोक जंगलात चुकल्याच मला माहित होत ..चुकायला माझी हरकत नव्हती पण हे लोक हे  चुकण एन्जॉय करू शकणारे नव्हते एका ठराविक प टर्न च्या बाहेर हे रिस्क घेवू शकत नाहीत हे मला माहित होत (हि चांगली गोष्ट असते कारण मग आपण त्यांना त्यांच्या कुवतीच्या बाहेर तानु शकत नाही)
निघालो ..मी सगळ्यात मागे ...चला निघालो इथ रस्ता संपला पण निश्चीत कुठून आत जायचं हे काळात नव्हत ...हार्डी ला त्या माणसान उजव्या बाजूचा रस्ता पकड अस सांगितलं होत .मला हेच टाळायच होत ..म्हणून त्य लोकांबरोबर ...जवळपास रहायचं होत ......मध्येच २ वाटा फुटल्या कि हे लोक मला मागे वळून विचारायचे कि कुठल्या वाटेन जायचं ....आणी मी डावी किवा उजवी जी मला त्या वेली वाटते टी सांगायचो ...पण मला आशचर्य वाटल कि ..वाट कुणालाच माहित नाही हे सगळ्यांना माहित होत ...तरी पण हे अस कस विचारू शकतात .......पण कदाचित मीच टी वाट जाणू शकतो हे टे जानत असावेत ...गुड ओके ...त्यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवून चालायला सुरवात केलीय हे सिद्ध झाल ..छान ...चढता चढता  रस्ता वर जायच्या ऐवजी खाली जायला लागला ...पुन्हा थांबलो कुठ जायचं ?(झालाना गोंधळ  आता ,,,बघ )मी साक्षात्कारी बाबासारखा खालच्या दिशेन हात केला ....वाट बरोबर होती ...
खरतर वाटेलाच विचारायचं असत कि तू कुठ जातेस ...माझ्या गावाला जातेस तर मी तुझ बोट धरतो लहान मुला सारख मला ने मला सगळय खाना खुणा दाखव .माझी आई हो ...मला तुझ्यावर विश्वास आहे ....इथ आंधळा विश्वास नसतो .मळलेली पायवाट आपणाला दिसताच असते  पण जेंव्हा अशा २ वाटा दिसतात तेंव्हा प्रशन पडतो ....
..पुढ लोकांना हाक मारली .....त्यांनी पण ओ दिली वाटेत बसले होते ...पुढ तोलार खिंड आली  प्रथम लीम्बुसार्बत पिल ...सूर्य मावळायची शक्यता होती म्हणून पुढ निघालो ...

पहिले १० मीटर ..प्रशांत जागेवर बसला ...मी त्याला सांगितलं कि तू तुझी बाग ठेव आणी पुढ निग ...मागून आलेल्या लोकांनी त्याला सपोर्त केला ..तो आणी दादा पुढ गेले .दादा घाबरला नाही ..जस काही तो त्याच गावात जन्माला आला होता ......हि अनुवान्शिकातता हा चर्चेचा आहे .हार्डी बाग घेवून चढला ..पण मला कळेना कि हे त्याला झेपतंय कि नाही ....मग मी विचारल तू ठीक आहेस ना ?...तो हो म्हणाला ..पुढे त्यान बाग काढून ठेवली ...आता त्याला स्वतःला वर चढवण हा त्य्च्यासाठी प्रोजेक्ट होता ....तो हुशार आहे पण अनेकदा त्याची हुशारी त्याला कायम सेफ झोन मध्ये ढकलते .आणी मग तो स्वतः:ची पाठ थोपटतो कि मी कस शहाण्यासारखा निर्णय  घेतला ....इथ मी पाहिलं कि त्यान स्वतःच डोक चालवण बंद केलाय आणी आता काय करायला हव टे तो करतोय .तो माझ्या बरोबर आहे त्याला माझ्या बरोबर असण्यात स्वस्थता आहे ....तो चढायला लागला ..थोड्या वेळान दादा आला .तुम्हाला इतका वेळ क लागतोय .मी त्याला रग ची गुंडाळी दिली व वर पाठव ल ..तो परत आला मग त्याला एक बाग दिली परत वर पाठवला ...तो परत आला ...इकडे अमेय ला वरती पाठवला आणी त्यची बाग ठेवून तो परत खाली गेला कारण हार्डी ची बाग आम्ही खाली ठेवली होती ..टी गेवून परत आला ...नंतर मला म्हणे तुमची बाग मला द्या ..मला कळेना त्याला डबल ओझ का  हव ?त्यावेळी मला काळाल कि प्रशांतची बाग पण माझ्याच खांद्यावर होती .........शेवटी तो झेड स्पॉट संपवला .....थोडस बसलो सूर्य मावळला  होता ...आमच्या जवळ २ ऑपशन होते रात्र तिथच काढायची ......किवा पुढ चालायचं पुढ २ वाटा होत्या ...बाकी सगळे पुढ निघून गेले होते आम्ही ५ जन फक्त तिथे होतो ....बराच पाणी संपल होत पुढ खूप चालायच् य ....आणी बाले किल्ल्याच्या बाजूने एक अवघड रस्ता जातो ...दुसरा सोप्पा लांबून पोचतो हे माहित होत आणी एव्हडाच माहित होत ....त्या फाट्या वर पोचलो ...एक बोर्ड असेल अस वाटत होत ...नव्हता ..अमावस्येची ..शनी अमाव्सेची रात्र होती ...काळा  कुट्ट अंधार ..आकाशात चांदण्या ..भरपेट पुण्यात कधीच दिसत नाहीत ( दादा ची कॉमेंट.. )अशा
असो ...सोप्पा मार्ग नाकारला का ? खरच का टे माहित नाही ....डाव्या बाजूचा जंगलातला मार्ग  निवडला  जरा पुढ गेलो ,,,अमेय पुढ झाला   मला मजा वाटली ...कारण कुणाला निश्चीत कोणचा मार्ग आहे हे माहित नव्हत . तो चुकला कारण जंगलात निश्चीत कुठून घुसायच हेच दिसत नव्हत माहिती नव्हत ..पुढ काय वाढून ठेवलाय टे पण माहित नव्हत ....मी अंदाज घेतला ...घाबरण मनात आल नाही आणी अमेय चुकला म्हणून भीती पण वाटली नाही ..आणी मुख्य म्हणजे किती धोका आहे असा हरडीकरणे गळा काढला नाही ....  कारण मग मार्ग शोधण्यापेक्षा त्याला समजावण ..त्याच्याशी लढन  यात अवेरनेस लागला असता ...चला सुरुवात चांगली झाली दादा सुद्धा घाबरला नाही ...मी पुढ झालो मी आवाहन केल जंगलाला... त्या वाटेला मी तिला शोधणार नव्हतो तीनच आम्हाला पुढ न्यायचं होत नीटपणे  शांततेत सहज पणान आम्ही जर या जगालाच भाग होवून गेलो तर हि वाट हि आमचाच पार्ट होईल आणी मग प्रवास हा आमच्या समोर प्रशन उभा राहणार नाही .अचानक गवतात जागा दिसली टी वाट सरळ जंगलात जात होती ..तीच होती का  दुसरी आणखीन खात्री करावी का असा विचार माझ्या मनात आला नाही .सरळ आत घुसलो पुन्हा अमेय ने लीड घेतलं ....चढतोय आणी चढतोय   प्रशांत .....अरे आपण बालेकिल्ल्यावर जाणार काय ?  मी----नाही आपल्या डाव्या बाजूला बांल्ले किल्ला आहे ...जंगलाल धक्का न लावता जाग न करता चाललो होतो ..टे त्याच त्याच्या व्यवहारात मग्न होत ...आम्ही चा ल न्यात मी घड्याळ काढून टाकले होते ..त्यामुळ किती वाजले  हा प्रशन नव्हता .पूर्ण अंधार जंगलात रस्ता होता मोकळ्या जागेत खडकाळ दगडावर   अमावस्येच्या रात्रीच्या ताऱ्यांच्या प्रकाशात त्या दिसताच नव्हत्या ........मी दादा ला सांगितलं ..दादा .आपली पायवाट तिच्या स्थायी भावान बाजूच्या दगडांपेक्षा वेगळी दिसायला हवी ...तिच्यावरचे बारीक दगड बघ ,,,संकेत शोध .......तो म्हणाला पपा हि बघा अर्धवट खाल्लेली काकडी ...गुड ..असाच शोध ...पापा ह्या गुठ्क्याच्या पुड्या छान ....पपा ...हे मिनट च्या गोळ्याची कॅव्हार्स .....ओके आपण योग्य मार्गान चाललोय .....मला जंगल खराब करण् मान्य नाही पण आम्हाला मिळालेल्या संकेतांनी मजा आली त्यानंतर आम्ही फक्त गुठ्क्याच्या पुद्यांचे पाकीट आणी गोळ्यांची कॅव्हर ...बिस्कीट पुड्यांची रिकामी कॅव्हर शोधात राहिलो ..मधेच अमेय थांबला ..त्याला कन्फुजन ...दादा तो पर्यंत तयार झाला होता त्याला समोर गवतात वाट दिसली .मी तातडीन विथआउट  डीले सांगितल त्या वाटेन जायचं .छान  म्हणजे  न बोलता सगळे सुरु झाले ..पुढ गेल्यावर अमेय खाली सरकला ...मी त्यला म्हणालो काय झाल ?नाही मला हि वाट वाटली .....अस तो म्हणाला ..मी ....नाही अमेय तुला तस क वाटल हा प्रश्न आहे ...काय संकेतांनी तुला तीकड जायला  उदुक्त केल .याचा विचार कर
पुन्हा जंगल यावेळी चढ नव्हता ..फक्त उतार ...हर्डीकर माग होता .  मागून चालला होता बऱ्याच वेळा आम्हाला त्याच्य्साठी एकदम हळू हळू  चालायला लागत होत .खूप दमलो होतो ...खिरेश्वर च जंगल ...तो कडा ..आणी पुन्हा हे जंगल हि अमावस्येची रात्र .....माहिती नसलेला रोड ....बरोबर लोकल लोक नाहीत ...जंगलात कुणी काही प्राणी आहेत कि नाही हे माहित नाही किती भयानक   आहे हे पण माहित नाही ..इथ कुनाला काही चावल तर काय करायचं याचा उपचार पण नाही आणी त्याला उचलून न्यायच्या परीस्तीतीत पण कुणी नाही ...पण सांगतो हा आताच विचार आहे त्या वेळी अस काहीच मनात नव्हत मधेच अमेय ला इंगळी दिसली   तेव्हडीच  ....

पुन्हा जंगल फक्त उतार आम्हा सगळ्यांकडे बातरया होत्या ..फक्त चालतोय ..हर्दीकारची सूचना तू तुझी एक बटरी बंद कर ..मी करून पहिली ...मला जरा अंधार वाटला मी पुन्हा सुरु केली त्यान पण मुद्दा पुढ रेटला नाही ...तो मागून हळूच म्हणतो अरे आपण गड पुन्हा उतरायला तर सुरवात केली नाही ना ?मी सांगितलं या किल्ल्याला सगळीकडे कडे आहेत जो पर्यंत कडा लागत नाही तो पर्यंत आपण उतरत नाही ...मध्येच मला पण वाटून गेल कि आपण दुसऱ्या गावाला पोचणार कि काय ....रस्ताच संपत नव्हता ..........मधेच थांबलो ब्लाइंड फेथ यापेक्षा दुसर काय म्हणायचं .....एका दगडावर बसलो .मधेच बातार्या विझवून कुठ उजेड दिसतोय क टे पाहिलं ..मगाशी ३ किमी वर तस वाटत होत आता तो पण दिसत नव्हता .मला अचानक जड वाटायला लागल ...मी थांबलो कि संपल ..मी हार्डी ला म्हणालो कि आपण जरा पुढ जावून बसू ..तो म्हणाला मला अजून जरा जास्त बटरी चार्ज करायची आहे .मला जरा जास्त दडपण आल मी त्याला उठावल आपण पुढ बसू आता उठ ...आम्ही उठून चालायला लागलो .  अचानक पाठीमाग मोठा आवाज झाला जंगलातून आला हर्डीकर चपळाईन माझ्यापुढे आला ...ओके मी मग राहिलो आता तो आवाज माझ्या माग  येत होता थोड्या अंतरानंतर तो बंद झाला ..मधेच मी मग वळून पहायचा पण प्रयत्न केला कि काय आहे ...खरच  सांगतो  काहीच भीती वाटली नाही ...मला भीती वाटते ...पण त्यावेळी वाटली नाही ...मला जंगलाची पण भीती वाटली नाही ... गप्पकन  एकदम समोर पठार आल आणी छोटे छोटे बाण दिसायला लागले  ..त्यानंतर आम्ही गुठ्क्याची पाकीट सोडली  आणी मिन्त्चे कॅवहार पण सोडले फक्त बाण पाहायला लागलो .वाटेत एक झोपडी लागली ...हुश्श
पण काही उपयोग नव्हता तिथ कोणाच नव्हत ..तिथ एक वाट येवून मिळाली होती ..टी सुरवातीची सात टेकडायवाली लांब पायवाट होती तिथून पुढ निघालो .थोड समाधान कि कशाच्या तरी जवळ आलो ... पुढ एका  ठिकाणी  गाई गुर होती पुढ एक हॉटेल होत माणस नव्हती .....आणी अचानक देवळाचे लाईट दिसले ....जी पहिली झोपडी दिसली तिथ दादा ने वाचाल कि इथे जेवायला मिळेल ..त्याला विचारल तर तो म्हणाला जे असेल टे मिळेल चालेल क? आम्ही हो म्हणालो शेजारी दगडावर पथाऱ्या टाकल्या .....मी सगळ्यांना सक्तीने पाठीवर झोपवल ....रीलाक्स  व्हा ...त्या नंतर १ तासाने जेवण आल भाकरी आणी बटाटा व वांग  न कुटलेल्या शेंगादाण्याबरोबर ....मी ३ भाकरी चुरून खाल्ल्या ....काहींना बायकोची आठवण आली ....कारण मीठ मागून घायायला लागल ..त्यांनीच तिथ झोपायची व्यवस्थ केली झोपलो रात्री मला जग आली झोपडी भोवती काहीतरी फिरत होत .पहाटे  उठून लगेच कोकण कडा पाहायला निघालो कारण सूर्योदयाबरोबर बदलणाऱ्या छटा.तो खोलपणा डोळ्यात भरला .छाती दडपून घेतली .
तिथच आम्हाला भास्कर म्हणून एक परमानंट  मेंबर भेटला तो ४०० रुपयात टेंट देतो जेवण देतो झोपायला चादर देतो गडावर आणतो आणी गडावरून सुखरूप उतरवून देतो ...मानसी ४०० रुपये ......(हर्डीकर दामल्यामुळे आला नव्हता) .....मी त्याचा फोन घेतला .तो नंतर लागत नव्हता ....पुन्हा देवळात गेलो  दादा ला तिथला काळा चहा आवडला नाही त्याला दुधाचा चहा हवा होता ....मला हसायला आल .....प्रशांतला पण चालायचा प्रॉब्लेम होता म्हणून त्याला लवकर पाठवला ...देवळात जरा बसलो तिथ लेणी आहेत पण टी कधी खाली मिळत नाहीत ...कोणीतरी मुक्कामाला असताच ...उघड्यावर झोपताना भीती वाटते ......किवा देवळात सोय होते ....काही लोक आमच्या नंतर रात्री आले अस काळाल ...आमच्याच मार्गान ...  निघताना हर्दीकर्ण निर्णय घेतला कि मी पाचनी मार्गाने येणार  त्याला उतरायची भीती वाटायला लागली आणी त्याला तो आलो त्या मार्गान उतरू शकणार नाही याची खातरी पटली ...नंतर तो त्या ब्भास्कर बरोबर पाच्नी मार्गाने पुण्याला परत आला ...मी त्याला माझा एक जादाचा मोबाईल दिला त्याकडे  पैसे होते . त्यवेळी मला प्रशन पडला कि काय कराव यांच्याबरोबर याव  कि त्याच्या बरोबर थांबव ...मी यांच्या बरोबर आलो कारण त्याच्या बरोबर एक्स्पर्ट येवू शकत होते ...प्रशांत ने एका मुलाला सामान न्यायचे पैसे दिले ..त्यान प्रशांत ला गड उतरवून दिला ...सामानासकट ...सुखरूप पणान ...तो पुढ निघाला   आमच गी पी एस बंद पडल  मग नुस्तेव फोटो काढले .....मग राहिलो   अमेय ला नास्ता करायचा होता पण मी म्हणलो चला ..कारण आम्ही रात्री आलो होतो ..आता परत त्याच मार्गानं जंगलात घुसायच होत ...आणी वेळ जाऊन चालणार नव्हत ....मग धावत पळत जावून त्यांना गाठल .
येताना जीथ जीथ २ वाटा हित्या तिथ तिथ दगडाचे बाण केले ....एक लाकुड  सापडल टे वाटेच्या तोंडावर जमिनीत खोचल .......जेणेकरून जो शोधेल त्याला त्या खुणा सापडतील ..मग अस ठरवल कि परत येवून इथ दगडावर बाण रंगवायचे .......हर्दीकारणे त्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे .......कामही सुरु केले आहे ....उतरतान भीती वाटत नव्हती ताण होता न चुकण्याचा  प्रयत्न होता ...दादा म्हणाला पापा निघायचं   ..म्हणल चल लेस बाध .....हळू हळू उतरलो  काही लोक धावत पळत उतरत होते ...काही लोक पावसात कसे चडत असतील के काही मला समजत नव्हत.....खुपच डेंजर ...पुन्हा खिरेश्वर जंगलातून .....उन्हात दुपारी ३ वाजता पोचलो तोच जाताना भेटलेला ग्रुप पुन्हा येताना बरोबर होता ..पुन्हा जंगला बाहेर आलो तेव्हा  त्याची काठी दादाने त्याला...जंगलाला परत दिली ....त्यान प्रवासासाठी आपल्याला मदत केली होती ...आता  परत दिली दुसरा कुणी जर त्याला काठी हवी असेल तर टी नवीन तोडणार नाही हीच वापरेल ......काहीतरी जुनी पुरचुंडी सोडल्य्सारखा झाल   खुपच माहिती जमा झाली जंगलान मला खूप शिकवलं ...काय टे माहित नाही ...पण मी त्याच्याशी बोलू शकतो खास मित्र सारख ..तो मला घाबरवत नाही ...माझ्या खास मित्रासारखी माझी काळजी घेतो .....एक विचार वेगळा सगळ्यांनाच मिळतो मला एक जाणीव मिळाली आहे ..........नंतर रात्री ७ वाजता पुण्यात पोचलो दुसऱ्यादिवशी काळाल कि हर्डीकर त्या भास्कर बरोबर पाचणे मार्गाने खाली उतरला ....काल  पासून आम्ही  गडावर फ्लोरोसंट बाण काढायचा प्रोजेक्ट हती घेतला  आहे ...१)दगडावर तारेच्या ब्रश ने बाण काढायचा २)तो साफ करायचा ३)त्याला पेंट करायचा   असा प्रोग्राम आहे त्याचे पैसे ,,लागणारी माणस ,,त्यांचे वेळ या सगळ्याच गणित हर्डीकर सांभाळणार .....मी फेसबुक वर त्याची माहिती द्यायची (फ्रेंड ऑफ ट्रेकर्स ) अस नाव ठेवलाय ..................आताच मला एक  फोन आला त्यात गोरक्ष गडला जायचं ....अवघड आहे म्हणतात ....शनिवारी सकाळी निघणार रविवारी रात्री परत ...

Madangad Trip


मदनगड >>>>>>>>>>>>>pune-samgamner highway .---aale fata---boti ...bramhanwada .kotul ....rajur bhandardara dam..before going to dam turn lefe  for ghoti road...  bari ..vasole fata...turn exactly aposit of that ..cement road ...8 km along the top of hill ..ambewadi ..amn alang madan kulang .....
29 ओगस्ट २०१२ ...संध्याकाळी ६ वाजता चंदू चा फोन आला उद्या मदन्गाडला निघतोय .येणार का ? हे साले दोस्त कमी दुष्मनच जास्त आहेत कि काय ...अरे आता सकाळी सांगायचा न ?(झोपला होता काय XXX )निर्लाज्ज्पानाचा कळस म्हणजे म्हणतो कि अजून १२ ता स आहेत कि ..सकाळी ६ वाजता निघू .
कडा चढायचा होता ४० फुटी ..पावसात जायचं कि नाही ...दुकानात गेलो ,खिळे घेतले .साधी दोरी .एक २० मिनिटात वाळणार सोलुशन .नेहमीचे बोल्ट घरात छताला  ठोकतो ते... म्हणजे शेवटच्या क्षणी लागतील त्या गोष्टी ....जे न्यायचं ते  समोर मांडलं.(.ते सगळ घेणारच होते ..पण तेव्हडेच सरफिरे होते ..म्हणून आंपण आपल सावध असाव ..)तसाच झाल नंतर सांगितलं कि दोर नाही म्हणून प्लास्टिक चा दोर आणला  तो पण नीट पुरत नव्हता .आमचा हर्डीकर मला म्हणाला कि ते दोर बाग .लाईट सगळ घेवून जा ...अमेयन अगोदरच हेड लाईट ..सेल सकट दिला होता..( तुम्ही कुठ कुठ जात असता ..हे वापरा)बर तो ट्रेक ला येत नाही ..पण बाजारात तो लाईट दिसला म्हणून आठवनीन घेतला ...असे हे दोस्त बेईमान साले ..बेईमान हि त्यांची पदवी आहे ...(अगोदरच सवय करून ठेवायची म्हणजे नंतर त्रास होत नाही..)
सकाळचा गजर लावला ..गेले २ महिने जे फोटो नेट वरून घेतले होते ..ते पुन्हा बघितले होते..फक्त आंबेगाव एव्हडाच नाव कळाल ..लोक माहिती देत नाहीत ..जाऊन येतात ..फक्त ..प्रत्येक वेळा दुसऱ्यानी स्वतः मरून स्वर्ग  बघायचा ...
काल पेट्रोल भरल होत ...जास्तीच सकाळी भरू म्हणालो .(का ? मी अस का केल ? प्रश्न मलापण आहे पेट्रोल चोरतात बर कुणावर संशय घ्यायचा   .मी एकदा असाच पुने पोलीस ची वेब बघत होतो ..पुण्यात ८५ लोक २ व्हीलर चोरणारे आहेत ..अधिकृत पकडलाय ...म्हणजे ५० लाख लोकसंख्या फक्त ८५ लोकांच्या भीतीमुळ रस्त्यावर चावी शिवाय गाडी ठेवू शकत नाही..हे एक प्रकारचे अतिरेकीच ना? ..उठल्यावर गँस  वर पाणी ठेवल ... अंघोळ केली ..निघालो ..चहा घ्यावा ..पण वाटेतच घेवू अस म्हणलो ( चहा करायला जमतो पण कंटाळा ) ..स्पीडो मीटर बंद ...अमेय कडून जी पी एस  उधार मागून घेतले होते..त्याची ट्रायल पण झाली होती पण त्याची फाई ल करप्त झाली म्हणून घरीच ठेवल ..६ वाजता निघालो ..घरून निघाल्यावर  चाकण येईपर्यंत एकही पंप उघडा नव्हता ...चाकण मध्ये २०० रुपयांचं पेट्रोल भरल .(.हा मूर्ख पण केला त्याची फळ नंतर भोगावी लागली कारण जायला २२५ किमी होत जाऊन येवून ५०० कि मी होणार होत आणि अडचणीच्या गावात ..जंगलात चाललो होतो ...तरी पण अस केल......)कमीत कमी ५०० रुपयाच पेट्रोल भरायला हव होत
खेड मध्ये चंदू व बंधू  भेटले ....निघालो   नारायणगाव ला वडापाव  २ खाल्ले .आलेफात्यानंतर   बोटी या गावाजवळून आत भंडारदरा ला निघायचं होत...विचारात विचारात( लोकांना मदनगड माहित नाही) ...मधेच बांधून   अंडी विचारली तेल मीठ चटणी पाव घेतले ......अंडी मिळाली नाहीत...गाडीच्या चाकात हवा बरोबर होती पण ती जास्त हवी होती कारण खड्यात गाडी आपटली कि काय होईल हे सांगता येत नव्हत आणि अचानक ब्रेक कमी लागायला लागले ...तस मी चालवतो हळूच ..तरी पण  मग पुढ ब्राम्हणवाडा ..कोतूळ  त्यापुढ एक फाटा संगमनेर कडून येवून  तिथ मिळतो पुढ भंडार दरा ला जाण्यासाठी ...परत येताना याच ठिकाणी आपण चुकू शकतो.....(संगमनेर )कि कोतूळ मध्ये मुख्य गावातून डाव्या बाजूला आत रस्ता आहे ..कळत नाही
पुढे राजूर  कुणीतरी एक शोर्ट कट सांगितला ज्यान ३० किमी वाचतात ...पण असुदेत ..घेतला नाही..पुढे भडार दऱ्याच्या अलीकडे एक फाटा फुटला तो रतनगड ला जात होता ..गेल्या वेळी तिथून गेलो होतो ....तिथ लोक होते...आम्ही मदनगड विचारल लोकांना माहिती नाही....कोणच कुठला ?अर्रेच्या हे काय ..आंबेगाव   म्हणल तरी कोणच कुठल ?चुकलो कि काय ? पण मागच्या वेळी गोविंद म्हणाला होता ३० ला मुंबई चे लोक येणार आहेत त्यांच्या बरोबर पाठवतो ..मी ठीक म्हणालो
त्याला फोन केला ..आणि नशिबान लागला ...हा मूर्खपणाच ते आंबेगाव कुठ हे गुगल वर नीट पाहिलं नाही ....म्हणल असेल जवळपास ..एव्हड लोकांना माहिती नसेल अस कस होईल ?एक माहिती होत कि ते घोटी गावाच्या  अगोदर आहे ...
त्यान सांगितलं बोरी नंतर वासोळे फाटा आहे त्यावरून आत ....त्याला म्हणल तू येणार का? हे पावूस खुप आहे ..आता मदनगड आम्ही करत नाही ...ठीक आहे ..सांधण व्ह्याली ला येत असाल तर नेतो ...त्याच फेवरीट  ते पण अर्ध्या पर्यंत
असुदेत ..ठीक आहे ....आता समोरची मांणस  नीट माहिती द्यायला लागली  ..निघालो भांडारदरयाला न जाता शेजारून जो स्टेट हायवे आहे एन एच २१ बहुतेक ..वाटेत अनेक डोंगर दिसले कि वाटायचं हा कुठला किल्ला असेल बर?
अचानक घाट  लागला ..कोकणात उतरलो ..च्यायला चुकलो वाटत आपण ...गेले पैसे वाया गेले आणि दिवस वाया गेले ......कारण रस्ता इतका वळणा वळणा चा होता कि मुलाला थोपटून अंगाई गावी तशी मंद झोप यायला लागली ५ तस सतत प्रवास करून थकलो  होतो...पण निसर्ग ग्रीन गोल्ड .....जरासा लुमिनास गोल्ड
ब्रेक जबाब द्यायला लागले होते ...वासोळे फाट्यावरून निघालो १० कि मी ..पुढच्या गावात बांधून विचारल भजन चालल होत ...अंडी आहेत का? ..नाही...जहाल व्हेज उत्तर आल पुढ पुन्हा पुढ ची वाट धरून आंबेवाडी ला पोचलो ..माझ्या जवळ गावकरी अडवून अवाच्या सवा पैसे मागतात हि त्यांची अप कीर्ती आली होती....लगेचच काही बाया समोर आल्या तुम्हाला कुठ जायचं आहे ..मदनगड ..त्यांच्यातल्या एका पुरुषाला आमच्या बरोबर जायला सांगायला लागल्या ....पुरुष कशाला एखाद्या मुलां /मुलीन /बाईन रस्ता दाखवला असता तरी चालाल असत.....त्या माणसाला विचारल येत का तुम्ही तर म्हणे मला गुर चाराय्चेत ...तिथ १५० रु मजुरी मिळते..आम्ही दुप्पट देतो ...किती पैसे घेणार ?   तुम्ही किती देणार?त्याचा उलट प्रशन ..अरे आम्ही ३ जन ....तूम्ही पुढ जावून तिथ मुलांना विचार...पैसे पण तेच सांगतील ..गाड्या पण तिथच लावा .मध्ये चंदू-बंधू उतरले .लाढू देत....पुढ गेलो तर ३-४ पोर दिसली एम पी ३ वर मोठ्यान गाणी लावून गुर राखत होती ....
त्यांना विचारल मदनगड ला जायचं आहे फक्त मदन...किती घेणार  १०-१५ जणांचा ग्रुप असता तर १००० घेतले असते पण तुमचे फक्त ३ जन ......मग ?......तुम्हीच सांगा ..बोलू लागले मी पुढ गेलो एका गुर चार नारयाशी बोललो ..त्याला म्हणल तुम्ही आम्हाला वाट दाखवणार का?  तो म्हणाला आम्ह हि  कष्टाची काम करत नाही म्हनंलो तुमच्या या मुलाला पाठवा तर म्हणे त्याला ते काम झेपणार नाही....
तेव्हड्यात चंदू बंधू परत आले .तावातच ..चला ...काय? ...मी विचारलाय सगळ ..आपण शोधात शोधात जाऊ .....हे याचं नेहमीच नाटक .जीवधन ला पण ..जाऊ पण किती वेळ लागणार आताच २ वाजले होते..पण तिथ पण चंदून ओळख काढली होती ..बिनकामाची..त्यातल्या एका पोराला माझ्या गाडीवर बसवलं आणि निघालो   वाटाड्या मिळाला नाही पोर हाटून बसली होती..."एकदम कोन्फीडनट "'  अजिबात बार्गेन करत नव्हती.....गाडीवर माग बसलेल्या पोराला म्हणालो .तू येतो का ..ते पैसे तुला देतो   किती देणार .. २०० रुपये ..मग तव्हाच बोलायचं ..गाडी वळवली  २००- नाही  ३००--- २५० नाही जमणार ३००
अरे त्या पायर्या जिथून सुरु होतात तिथून तू परत जा तिथ पर्यंत दाखव .....नाही तू कड्यावर येवू नको  ...
ठीक आहे ३०० रुपये पण जो ४० फुटी कडा आहे तिथ पर्यंत तुला आल पाहिजे ...हो हो ......निघालो तो जरा घा ई करायला लागला ...गाड्या एका खोपटा समोर ठेवल्या
मी फोटो काढत होतो अचानक त्या गाईड ने शेताच्या बा धन न्यायला सुरुवात केली ..मला कळा ल कि येतान हि वाट सापडू शकत नाही...मी त्याला नीट ने म्हणू लागलो तो गप्पच...वाटेत २ ओढे लागले बारीक पाऊस ..कँमेरा जपायचा होता..
जंगलात शिरताना त्यान तोंडात तंबाखूचा बार ठोकला .....निघालो जंगल एकदम दाट  रस्ते ..गुरांच्या पायवाटा ...मनसोक्त कान्फुजन ..ते पु ढ जायला लागले मी म्हणले दादा मला तुझा स्पीड झेपत नाही, बर का रे जरा हळू चाल ....वाटेत शेजारी एक साप दबा धरून बसलेला .( म्हणजे ती स्प्रिंग सारखी रचना समोर सावज दिसलं कि झे प घेतली .बा रका होता पण डीस्काव्हारीव र बघतो तसा ..मी फोटो काढला ..बंधू म्हणे मी त्याला काठीने उचलतो...हा कधी कधी जास्त हुशारी करतो ....मी रागावलो ..जोरात सांगितलं अस काही करायचं ना ही ...त्याला त्याच्या जागी असुदेत ...त्याच जे काम चालली ते करूदेत..निघालो त्याला म्हणल तुला माहिती आहे का तो कसला साप होता ...नाही मी डीस्काव्हारी ला पाहिलंय ...मी मनातल्या मनात डोक्याला हात लावला या भाऊ ला तो विषारी आहे कि बिनविषांरी हेच माहिती नव्हत....जड..जास्त  हुशारी अशी अंगाशी येते....( शासन एव्हडा खर्च करत ...सापांवर अतिशय स्वस्त ग्रंथ काढू शकत नाही का?---भडवे चोर आहेत ...त्यांच्या नोकर्या त्यांना  प्यारया आहेत .त्यांना वाटत कि लोकांवर आम्ही उपकार करतो ..त्यांना सुख सोई देवून ...वन खात्याची अशी पुस्तिका नाही ....गरजच वाटत नाही ..कारण ते इंग्रज इथून गेले शरीरान ते आपल्या डोक्यात आपल्या लोकांना तुच्छ लेखण्याची भावानेच बीज रोवून गेले...किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी तो भडवा तहसीलदार सगळी मदत गोदामात ठेवत होता आणि इकड लोकांना खायला नव्हत आणि कार्यकर्त्यांना पण ...
अचानक आम्ही एका उघड्या भागापाशी आलो .....जपून चला ..माझा २५०० चा  बूट खालून झिजला होता माझी चूक बदलला पाहिजे होता..तो फाटत नाही उसवत नाही झिजत पण नाही ...पावसान ओला  झाला होता....आता आम्ही एका नदीच्या प्रवाहात शिरलो ...तिथून परत शेजारून वरती चालू लागलो ...पाय वाट पार करताना  कसलीही ओळखीची खूण ठेवता आली नाही...पुन्हा दुसरा उघडा खडक वरती उंच मदन्गादाची खिंड दिसत होती
आणि आमच्या वाटाड्याला साक्षात्कार झाला ...साहेब आम्हाला सुतक येईल कारण आता मी २ साप बघितले ...त्यान आम्हाला खरच खिंडीत गाठल ...मी त्याची भीती समजू शकत होतो..त्याला सांगितलं कि माझ्यावर विश्वास ठेव ..तुला दिलेलं काम बरोबर कर ...
तो म्हणे इथच आणून सोडायचं ठरल होत..( ताण आला कि भली भली लोक आपले आणि बाहेरचे  बिनधास्त खोट बोलतात ).मी ठणकावल ..नाही तू तो कडा जिथून सुरु होतो तिथ पर्यंत पोचवणार होतास ...आणि तुला माहिती आहेका तो मधला आडवा १० फुटाचा पँ च ..तो म्हणतो आता काय राहिलंय तुम्ही तो सहज पार पाडा ल .टू त्या कड्याच्या खालच्या भागापर्यंत यायचं ठरवल होतास ..त्याचे पैसे ठरले होते.आता त्याला कळाल कि मला बरीच माहिती आहे ..मग नरम पडला ..पण मी येणार नाही ..चंदून शेपूट टाकल (तो भाडू काहीतर निशित बचाकाला असणार ...त्या शिवाय असा अचा नाक कसा हा माघार घेतोय ..आणि ते दोघ अगोदर पुढ बोलत गेले होते,,,असो ..मला म्हणे तुम्हीच ठरवा )
मी त्याला चुचकारल ..तू आम्हांला त्या खिंडी पर्यंत ने ..नाहीच...वरती पावसाची चिन्ह जोरात होती धुक दाटून आल होत..( कदाचित त्याला कळल कि परतायला उशीर होईल त्यापेक्षा इथूनच परत फिरा..)..ठीक आहे चाल पुढ जरा आणखीन स्पस्ट वाट दाखव ..तो तयार झाला ......निघालो पुढच्या टर्न ला म्हणाला आता मी निघतो...चंदू म्हणे जे होईल ते द्या ..बर ...मी त्याला विचारल किती ..द्यायचे ..तो म्हणाला जे ठरलाय ते ...
मी १०० देतो ..अस कस ..इथपर्यंत आणलाय कि ? अरे तू आम्हाला वाटेत अर्धवट सोडून चाललायस ...येताना कस उतरायचं हे माहिती नाही ......त्याच म्हणन कि मी त्याला सगळे पैसे द्यावेत,,मी १५० देतो ...१०० दिले ..५० ते मी तुला उतरल्यावर देतो ...आताच देवून टाका ना ?..तुला उतरल्यावर देतो (मला द्यायचे होते ..पण सुटे नव्हते..)तो निघून गेला ..आम्ही वरची वाट धरली ..(तो खरच भिला असेल तर देवान त्याला स्वतःच रक्षण करायची बुद्धी द्यावी )
बंधू पाय घसरून आपटला ...पाठीवर बाग होती त्यामुळ वाचला मी त्याला माझी पण बाग दिली होती ..माझा स्पीड कमी झाला होता ..हृदय खुप फास्ट चालल होत ...त्याचा रेट  खाली आला पाहिजे हे कळत होत ...प्रथम मी त्याच्या बरोबर विलंबित लय ..त्याचे ४ ठोके बरोबर माझा एक ठोका मोजायला सुरुवात  केली .....काही काळान काय माहिती काय झाल पण ते धड धड नॉर्मल झाली ...नदीची वाट पाऊस ..तो वरती जास्त झाला तर पूर येणार ..ओके च काम. जिथ वाट उंच दगडान अडली तिथ साईड कारवी मोडून वाट करायची चंदू लवकर वरती जावून बसला वरती दगडाच्या एका खोबणीत ..इथ वाट शोधात होतो ...सापडली नाही ...अरे साईड  ने आहे, उतर खाली ..धुकं भरमसाठ पाण्याच्या लाटेसारख वरखाली होत होत ..साईड ने  निघालो
मदनगड डाव्या बाजूला ठेवून निघालो ...मनात खुप प्रश्न होते ..आपण आलोय आंबेगाव च्या बाजून ...समजा दुसऱ्या बाजूने आलो तर उद्धवने गावातून  वरती याव लागल असत ....आणि सीन वेगळाच असता .सगळीकडे धुक पाउस ...पण अंदाज करायला सगळाच सारख दिसत होत ..पण निघालो ..चंदू म्हणे सापडल्या पायऱ्या..त्याची ती   नजर जरा छांन आहे,...पायऱ्या चढून तो वरती निघाला .एस...... तेच ते केक मध्ये कापलेल्या पायऱ्या ...मी एकदाच खाली पाहिलं आणि ठरवल कि इथ जर गोरक्ष गडासारख  झाल तर ....माझ आव्ह्गड होईल ....फक्त ३ पायऱ्या पुढच बघत होतो..दगडाला चिकटून चाललो ..पायऱ्या रुंद आहेत पण बाहेरच्या बाजूला कळलेल्या आहेत .आणि त्यात शेवाळ लेल्या ...भीती वाटत होती ..गरगरायला व्हायची ...मी निसर्गाला शरण गेलो त्या दगडातून ताकद घेतली तो माझा शत्रू नव्हता ..मित्रच होता..
अचानक तू आठवलीस  खोडसाळपणे हसायला लागलीस मी पण मंद स्मित केल ..हो कारण माझी खरच टरकली होती ते गरगरायला लागल कि मग मला काही सुचत नाही आणि मग मधेच जागेवर बसायचं ..बरोबर नव्हत ..४ वाजले होते ..वेळ कमी होता...तुला म्हणालो बघ ना खरच घाबरलोय ..तुझ्याशी गप्पा मारत एक एक पायरी चढायला लागलो ...मी सरळ चढू शकलो असतो ...पण तो गेम झाला असता ..मी राज ला शब्द दिला होता मी कसलाही स्टंट करणार नाही ..स्वतः: होवून  कसलाही धोका  घेणार नाही ..मला स्वतः ला तिथ त्या जगात  परत न्या य च होत..अर्रेच्या पण जादूच झाली ..तू आता बाहेर नाहीसच तू आतच आहेस ..बघ ना कसलं खोल आहे ...४००० फुट ती गाव कशी खेळण्यातली सारखी दिसताहेत ...ओके चल पुढ तू म्हणालीस ...आता मला तुझा कसलाच त्रास नाही   मि  तू  आणि तू मीच आहे ...
||जय  महाकाल||...दुसर काय म्हणायचं ....||.जय महाकाल ||
चढलो वरती ...आणि उजवीकडे वळलो  तर चंदू दिसेना ....बंधू ला म्हणल कुठ आहे हा क मार ...तर ओ नाही जरा पुढ गेलो ..तर तो लीप ऑफ फेत  चा ५ - १० फुट रुंद ट्राव्हर्स. असा कि  सटकला तर गेलात ...विचारच करायचा नाही...दगडाला चिंकटून  पुढ जायचं बंधू  पुढ गेला ..बँग  ठ्ठेवून आला ..मी त्याच्याकडे बँग दिली कँमेरा माझ्याकडे होता ..पण शुटींग चा विचारच आला नाही....दोघाही पलीकडे गेलो वरती सुंदर निळी फुले जांभळी फुले ओळीत लावल्या सारखी.  उगवली होती जणू तोरणच बांधलाय...या या स्वागत आहे तुमच ..म्हणतोय हा गड..
राज  न सांगितलं होत कि " आता सौंदर्य  पाहायला लागा ..."खरच त्यामुळ त्या कड्याची भीषणता कमी झाली एखाद्या काळा  कुट्ट रामोशी ..च्या गालावर  पावडर ..लिपस्टिक लावून त्याच रौद्र रूप कमी केल्या सारख ....
अचानक वरून चंदूचा आवाज आला ...पठ्या वर निम्यात चढला होता   नुसता दोर न लावता...दोर लावून बघत होता ...तिथल्या एका पहारीच्या टोकाला दोर लावून उभा राहिला नंतर त्याच्या शेजारी एक खिळा  मारला होता त्यावर दोर टाकता येत नव्हता..पण नंतर अडकवला आणि त्याचा आधार घेवून डाव्या बाजूला सरकला .....तिथून पटकन वर जायचं तर म्हणे तुमच्या बँग  द्या .....अरे  बाबा ..तू अगोदर वर चढ ..वरती दोर बांधायला एक जागा केलीय .(नेट वर पाहिलं होत).....एखादा फुट वर चढला असेल कि लगेच त्याला ती  दिसली .  तिथ त्यान दोर बांधला ..आणि बँ ग वर घेतल्या ...मि विचार केला आपल्याला सरळ चढाव लागेल दोर न घेता खुप आव्ह्गड ...शरीर साथ देत नाही.  बोट टेकवायला पण जागा नाही .दोराला हात लावला तर तो दोर प्लास्तीक्चा होता ताणला गेला आणि मी ठेवलेला पाय पण सरकायला लागला ..म्हणून सोक्स काढले  तर पाय अजून जोरात घसरले...पुन्हा सोक्स घातले आता पाय घसरत नव्हते..
बंधूला म्हनला मला जरा प्रोब्लेम आहे ...तो घाबरला ..ओके ठीक आहे तुला चढायच नसेल तर परत निघुयात ...मला विश्वास येत नव्हता ...माझा विश्वास हि एक गोस्ट ..कड्याचा विश्वास हि दुंसरी....आणि मी कधीही मागच्या आयुष्यात आं कडा चढलो नव्हतो ..मला हे काळात होत कि आपण करतोय ते जास्त प्रोफेशनल नाही.
पण मी विचार केला ..परत म्हणजे पुन्हा डोक्यात ढोल वाजनार ..मदनगड करायचा राहिला आहे..पुन्हा खोबणीत पाय ठेवूनवर  निघालो ..मी माझ्या उभ्या आयुष्यात असा कधी चढलो नव्हतो ...छाती कड्याला लावून वर चढायच ..९० डिग्री खोबणीत ..बोट घालाय्च्ची पाय गुंतवायचे ...त्या बरोबर पाठीमाग तोल जावू द्यायचा नाही. पडल कि २-३ हजार फुटाची घसरगुंडी...
पहिले ५ फुट चढलो आणि लगेच वेग धरला ..मला माहिती होत कि मी एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबलो कि पाय हात अवघड नार ...हात दोराभोवती गुंडाळ ले ..३ वेढे ...तोच दोर कमरे भोवती ...बंधू म्हणत होता कि दोराचा आधार घ्यायचा त्याला लटकायचं नाही ..त्याच बरोबर होत ...पण मला दगडाला चीकटायचं तर कस हेच कळत नव्हत ..भीती होती नंतर त्याच काळजीत रुपांतर केल ...शोधायला लागलो तर खुप खाचा सापडल्या ते इंस्टनन्त शिकवण होती.डायरेक्ट  ट्रेनिंग डाउनलोड झाल.(.माट्रीक्स  आठवतो ..ते हेली कॉप्तर चा ट्रेनिग.).. वरच्या खिळ्या पर्यंत गेलो त्यावर उभा राहिलो तर चांगला रेस्ट  होता  तिथून वरती जिथ दोर अडकवला होता तिथ वरती जायला प्रश्न आला .तर त्यावरच पाय दुमडून ठेवला आणि वर आलो...( जाताना बिर्ला व्हाईट सिमेंट नेल होत ...जिथ पाय ठेवौच्या जागा आहेत तिथ ते लावायचं होत )
मदनगड चढला .....नंतर बंधू पण वर आला ...संध्या काळचे ६ वाजत होते....चंदू म्हणाला अंधार पडायच्या आत परत जायचं आहे ...मला माहिती होत आता वरती धुक्यात काही बघता येणार नाही...थोड हिंडलो   पुढ चालता चालता  माती पायवाट धासायला लागली आणि परत उतरायला सुरुवात केली ..खूपच थकलो होतो...उतरताना बंधू  न शुटिंग केल ...आता तातडीन आवरायला घेतलं
सकाळपासून २ वडापाव वर होतो ...मी जेवणाला १ चपाती खातो ..त्यामुळ मला त्याचा त्रास झाला नाही...पण फक्त ब्रेड होते...तेल अंडी  मिळाली नाही शेवट पर्यंत..कोंबड्या खुडूक झाल्या होत्या काय ...सगळ्यांच्या
पुन्हा तो लीप ऑफ फेत चा पँ च ,,,उतरताना पण खाली पाहिलं नाही ...तो कालावनतीनिच्या गडाचा अनुभव हाताशी होता...
खाली उतरलो शेवटच्या पायरीवर डोक ठेवलं .....या गडा न मला जो अनुभव दिला ..त्याबद्दल मी त्याचे आभार मानले ..जस लहान मुल बापाच्या अंग खांद्यावर खेळावं ..आणि त्याच्या बिन न्धास्त पनाची काळजी बापान घ्यावी ..आणि त्या लहान मुलाला त्याची  जाणीवच नसावी ..अस आपल असत ..मी केल...
हि सगळी एक माया आहे ..माया जाल ..जाळ आहे त्यात आपण अडकलो आहोत ..आपले इगो ..डर..सुख काही निर्माण केलेलं काही निर्माण झालेलं ...मुळात आपल्याजवळ आपल अस काय आहे तेच शेवट पर्यंत आपल बाकी सगळ हा भास आहे या मायावी दुनियेचा .आपण इच्छा करतो आणि आणि मग त्या इछेचे गुलाम होतो ..आणि मग ती इच्छा संपली तर काय?याचा डर आपला जीवनभर पाठलाग करत राहतो...मी पण इगो तो पाठलाग सोडून देवू शकत नाही...आणि आपण एका राहत गाडग्याचा भाग झालो आहोत हेच विसरायला होत...( च्या आयला हे राहत गाडग्याच पाही निशित कोण पितय ..कुणी आपल्याला कामाला लावलाय ? काय मेदू आहे ना त्या गेम रचनारयाचा ?)
मी आभार मानले..गडाचे ..||जय महाकाल||
हे निसर्गच रौद्र रूप मला तुझ्याशिवाय कोण दाखवू शकल असत हे शंकरा  ....आणि त्याचा प्रेमळ पणा   कुणी मला समजावून दिला असता तो कातळ मला कधीच टोचला नाही थोड्याश्या कठीण गादीसारखा होता....
पुन्हा खिंडीत ...बंधू म्हणे इथूनच आलो होतो का रे ....हो लवकर चालल्याला पाहिजे मी बूट काढून टाकले सोक्स वर उतरायला लागलो ..पुन्हा त्या नदीतून आगळ्या गोट्यांनी पायाच्या तळव्यांना अक्यू प्रेषर केल...४-५ वेळा पडलो  एकदा तर पडल्यावर उठलोच नाही कंटाळा  आला  बसून राहिलो  ...डावा गुढगा दुखायला लागला .पाय टाकला कि वेदना ..अचानक मंनका  कळ आल्या सारखा दुखला ...अरे बापरे ..घाबरलो..( तुम्ही चांगले असता पण हलला कि दुखत इतक असत कि समोर वाघ आला तरी पळायचा विचार येणार नाही..)
चंदू म्हणे लवकर चला ...अंधार पडायच्या आत खाली पोचायला हव ...हे तो ६-१ ५ ला सांगतोय   शेवटी नदी संपली अनेकदा चुकीचे मार्ग निवडता निवडता वाचलो ..चंदू म्हणे कि बोलत उतरू ....म्हणजे वेळ जाईल ..मी म्हणल अरे तस नाही ..नेह मीचा  रास्ता असेल तर ठीक  आ हे ...इथ ते चुकण परवडणार नाही ७-३० झाले ..
परत जंगल लागल नदी संपली पावसामुळ नदीचा पाणी वाढल होत..मी बूट घातले आणि झाप झाप उतरायला लागलो ..मी म्हनला बँ टरी लावायची का? तर म्हणे कि नको ....भ्रम होतात आणि रस्ता चुकायचे चान्स जास्त..मला पण ते योग्य वाटल जो पर्यंत दिसतय तिथपर्यंत तसाच जावू....
जाताना जी चिन्ह दिसली होती त्याची ओळख पटवत निघालो ...तो एक कलेकटीव इंटेलिजन्स होता .. शेवटी त्या  ओढया  चा आवाज आला ...किती पाणी असेल काय माहिती ..आता बँ टरी काढली ...जाताना त्या मुलां न सरळ वाटेन न नेता कुठून तरी शेतातून नेल ..आमच्यकडे पावरफुल बँ टरी होत्या ..पण मार्गाच सापडत नव्हता ..मी ढकलल्या सारखा चालत होतो...
चंदू व बंधू  सापडेल तो मार्ग काढत होते.....शेवटी मी त्यांना थांबवल आणि जाताना आपल्याला हा डोंगर लागला होता तो ओलांडायचा नाही एव्हड बघ  अस म्हनालो  ...

८ वाजले ..गाड्या घेतली ..मी गाडीत पेट्रोल कमी भरल होत ..जाताना गाडी बंद पडणार हे निशित होत...मी नीट  विचार करून पेट्रो ल भरल नाही ..त्याचा ..आता प्रशन उभा राहिला ...अचानक पुढ च्या गावात एका दुकानात विचारलं पेट्रोल आहेका ?> तो नाही म्हणाला ..मी म्हणालो तुझा काय रेट  असेल तो देतो  .प्लीज जेव्हड असेल तेव्हड दे...तर म्हणे किती लिटर हवाय...२ लिटर ...कारण खराब असे ल तर जास्ती खराबी नको....
नि घालो ....भंडारदरा पास ...संगमनेर ची पाटी लागली .....पुन्हा रस्त्याच्या खुणा ...चेक करत प्रचंड पाउस ...मग तो दादाचा तीकोनाला घेतलेला  प्लास्तीक चा कागद  का मी आला त्यातून बंधूच  डोक बाहेर काढाल. रेडी रेनकोट
पुढ राजूर कोतूळ ब्राम्हणवाडा ..चंदू कोतूळ ला प्रचंड पाउस होता सरळ पुढ घुसला आम्ही त्याच्या पाठीमाग ..मी बंधूला म्हणालो कि अरे हा असा कसा घुसला ...रस्ता चुकला वाटत ...पुढ गेल्यावर त्याला थांबवला ..तर म्हणे मी थांबणारच होतो...परत मागच्या च्व्कात आलो ..कपडे काढून पिळले ..दुपारी दोन पासून ओले होते..
पुढे पाउस संपला आणि चंद्र उगवला ...अरे वा पौर्णिमा होती ...खुप चं वातावरण .चान होत.....पुढ एक हॉटेलात जेवलो मला गाडीवर तांग टाकता येत नव्हती सगळ अंग दुखत होत...अन्दर्वेअर  सकट सगळ ओळ झाल होत .....पुढ रस्त्याशेजारी गाड्या थांबवल्या आणि शेकोटी केली बाभळीचे काटे लगेच पेटतात ..शेकलो बूट वाळवले ...तेव्हड्यात पोलीस आले ...त्यांना सांगितलं कि आम्ही मदन्गाडला गेलो होतो ..पूर्ण भिजलोय त्यामुळ शेकोटी केलीय...सोडलं
मध्ये आळेफाटा नारायण गाव ...तिथ गरम दुध घेतलं रात्रीचे ४ वाजले ..बंधून जरा झोप काढली मी पण पेंगलो
मी रात्री गाडी चालवत नाही ..आणि वेगात तर नाहीच नाही चंदू म्हणे त्याला सकाळी मुलाला शाळेत सोडायला जाव लागत म्हणून लवकर निघू ...निघालो ..वाटेत गाडी स्किड झाली मी गाडीवरून खाली ढू नग नावर गोल फिरलो आणि आपटलो पूर्ण चिखलात ..लागल नाही मी त्याच्या कडून गाडी घेतली ..पण मग माझेही डोळे झाकायला लागले....
आणि गाडी फुर फुर करायला लागली शेजारी पेट्रोल  पंप ..मी त्य दोघांना पुढ व्हायला सांगितलं पंपावर गेलो .कळा ल कि ६ वाजता पंप सुरु होणार समोर गाडी लावली आणि एका कोपऱ्यात झोपून गेलो ...६-३० ला उठलो पेट्रोल भरल पुण्यात आलो
आरशात पाहिलं तोंड एकदम काळ पडल होय..
पण समाधान कि मदनगड ला जावून आलो
जीपीएस   घेवून एकदा त्राकिंग करायचं आणि ती फाईल  गुगल वर लोड करायची १० मीटर मध्ये तुमचा रस्ता बरोरोबर असतो शिवाय असा रस्ता ताखाव्णारा मोबाईल ५००० रुपयांना मिळतो.....त्यावर हि फाईल पुन्हा लोड करता येते ...आणि तम्ही एखाद्या वाटाड्या शिवाय पुढ जावू शकता.....यांना कस काळात नाही कि जसे जेव्हडे लोक जास्त येतील तस इन्कॅम वाढत जाईल ..अध्या फक्त गुरच वळतात ...पटकन पैसे मिळाले पाहिजेत..यावर विश्वास आहे..गडावर ठोकलेले खिले तोडून टाकतात ..आव्ह्गड परीस्तीती कायम ठेवतात .....
अस काही ट्रेकर्स ची पण दुखते ....त्याचं अस म्हणन आहे कि तिथ जान सोप राहू नये ..अवघडच असाव ...हे मूर्ख लोक पण रस्ता अवघड करून ठेवत असतील ....मी सांगतो नीट देव्हालाप केला तर हे मोठ मार्केटिंग ...हि जागा भविष्यात जबरदस्त होईल ....तिथून दिसणारा नजरा लोकांना दाखवायचे ५००० मिळतील  .......
कोण समजून सांगणार .......कोण समजणार ...