Sunday, 2 September 2012
Madangad Trip
मदनगड >>>>>>>>>>>>>pune-samgamner highway .---aale fata---boti ...bramhanwada .kotul ....rajur bhandardara dam..before going to dam turn lefe for ghoti road... bari ..vasole fata...turn exactly aposit of that ..cement road ...8 km along the top of hill ..ambewadi ..amn alang madan kulang .....
29 ओगस्ट २०१२ ...संध्याकाळी ६ वाजता चंदू चा फोन आला उद्या मदन्गाडला निघतोय .येणार का ? हे साले दोस्त कमी दुष्मनच जास्त आहेत कि काय ...अरे आता सकाळी सांगायचा न ?(झोपला होता काय XXX )निर्लाज्ज्पानाचा कळस म्हणजे म्हणतो कि अजून १२ ता स आहेत कि ..सकाळी ६ वाजता निघू .
कडा चढायचा होता ४० फुटी ..पावसात जायचं कि नाही ...दुकानात गेलो ,खिळे घेतले .साधी दोरी .एक २० मिनिटात वाळणार सोलुशन .नेहमीचे बोल्ट घरात छताला ठोकतो ते... म्हणजे शेवटच्या क्षणी लागतील त्या गोष्टी ....जे न्यायचं ते समोर मांडलं.(.ते सगळ घेणारच होते ..पण तेव्हडेच सरफिरे होते ..म्हणून आंपण आपल सावध असाव ..)तसाच झाल नंतर सांगितलं कि दोर नाही म्हणून प्लास्टिक चा दोर आणला तो पण नीट पुरत नव्हता .आमचा हर्डीकर मला म्हणाला कि ते दोर बाग .लाईट सगळ घेवून जा ...अमेयन अगोदरच हेड लाईट ..सेल सकट दिला होता..( तुम्ही कुठ कुठ जात असता ..हे वापरा)बर तो ट्रेक ला येत नाही ..पण बाजारात तो लाईट दिसला म्हणून आठवनीन घेतला ...असे हे दोस्त बेईमान साले ..बेईमान हि त्यांची पदवी आहे ...(अगोदरच सवय करून ठेवायची म्हणजे नंतर त्रास होत नाही..)
सकाळचा गजर लावला ..गेले २ महिने जे फोटो नेट वरून घेतले होते ..ते पुन्हा बघितले होते..फक्त आंबेगाव एव्हडाच नाव कळाल ..लोक माहिती देत नाहीत ..जाऊन येतात ..फक्त ..प्रत्येक वेळा दुसऱ्यानी स्वतः मरून स्वर्ग बघायचा ...
काल पेट्रोल भरल होत ...जास्तीच सकाळी भरू म्हणालो .(का ? मी अस का केल ? प्रश्न मलापण आहे पेट्रोल चोरतात बर कुणावर संशय घ्यायचा .मी एकदा असाच पुने पोलीस ची वेब बघत होतो ..पुण्यात ८५ लोक २ व्हीलर चोरणारे आहेत ..अधिकृत पकडलाय ...म्हणजे ५० लाख लोकसंख्या फक्त ८५ लोकांच्या भीतीमुळ रस्त्यावर चावी शिवाय गाडी ठेवू शकत नाही..हे एक प्रकारचे अतिरेकीच ना? ..उठल्यावर गँस वर पाणी ठेवल ... अंघोळ केली ..निघालो ..चहा घ्यावा ..पण वाटेतच घेवू अस म्हणलो ( चहा करायला जमतो पण कंटाळा ) ..स्पीडो मीटर बंद ...अमेय कडून जी पी एस उधार मागून घेतले होते..त्याची ट्रायल पण झाली होती पण त्याची फाई ल करप्त झाली म्हणून घरीच ठेवल ..६ वाजता निघालो ..घरून निघाल्यावर चाकण येईपर्यंत एकही पंप उघडा नव्हता ...चाकण मध्ये २०० रुपयांचं पेट्रोल भरल .(.हा मूर्ख पण केला त्याची फळ नंतर भोगावी लागली कारण जायला २२५ किमी होत जाऊन येवून ५०० कि मी होणार होत आणि अडचणीच्या गावात ..जंगलात चाललो होतो ...तरी पण अस केल......)कमीत कमी ५०० रुपयाच पेट्रोल भरायला हव होत
खेड मध्ये चंदू व बंधू भेटले ....निघालो नारायणगाव ला वडापाव २ खाल्ले .आलेफात्यानंतर बोटी या गावाजवळून आत भंडारदरा ला निघायचं होत...विचारात विचारात( लोकांना मदनगड माहित नाही) ...मधेच बांधून अंडी विचारली तेल मीठ चटणी पाव घेतले ......अंडी मिळाली नाहीत...गाडीच्या चाकात हवा बरोबर होती पण ती जास्त हवी होती कारण खड्यात गाडी आपटली कि काय होईल हे सांगता येत नव्हत आणि अचानक ब्रेक कमी लागायला लागले ...तस मी चालवतो हळूच ..तरी पण मग पुढ ब्राम्हणवाडा ..कोतूळ त्यापुढ एक फाटा संगमनेर कडून येवून तिथ मिळतो पुढ भंडार दरा ला जाण्यासाठी ...परत येताना याच ठिकाणी आपण चुकू शकतो.....(संगमनेर )कि कोतूळ मध्ये मुख्य गावातून डाव्या बाजूला आत रस्ता आहे ..कळत नाही
पुढे राजूर कुणीतरी एक शोर्ट कट सांगितला ज्यान ३० किमी वाचतात ...पण असुदेत ..घेतला नाही..पुढे भडार दऱ्याच्या अलीकडे एक फाटा फुटला तो रतनगड ला जात होता ..गेल्या वेळी तिथून गेलो होतो ....तिथ लोक होते...आम्ही मदनगड विचारल लोकांना माहिती नाही....कोणच कुठला ?अर्रेच्या हे काय ..आंबेगाव म्हणल तरी कोणच कुठल ?चुकलो कि काय ? पण मागच्या वेळी गोविंद म्हणाला होता ३० ला मुंबई चे लोक येणार आहेत त्यांच्या बरोबर पाठवतो ..मी ठीक म्हणालो
त्याला फोन केला ..आणि नशिबान लागला ...हा मूर्खपणाच ते आंबेगाव कुठ हे गुगल वर नीट पाहिलं नाही ....म्हणल असेल जवळपास ..एव्हड लोकांना माहिती नसेल अस कस होईल ?एक माहिती होत कि ते घोटी गावाच्या अगोदर आहे ...
त्यान सांगितलं बोरी नंतर वासोळे फाटा आहे त्यावरून आत ....त्याला म्हणल तू येणार का? हे पावूस खुप आहे ..आता मदनगड आम्ही करत नाही ...ठीक आहे ..सांधण व्ह्याली ला येत असाल तर नेतो ...त्याच फेवरीट ते पण अर्ध्या पर्यंत
असुदेत ..ठीक आहे ....आता समोरची मांणस नीट माहिती द्यायला लागली ..निघालो भांडारदरयाला न जाता शेजारून जो स्टेट हायवे आहे एन एच २१ बहुतेक ..वाटेत अनेक डोंगर दिसले कि वाटायचं हा कुठला किल्ला असेल बर?
अचानक घाट लागला ..कोकणात उतरलो ..च्यायला चुकलो वाटत आपण ...गेले पैसे वाया गेले आणि दिवस वाया गेले ......कारण रस्ता इतका वळणा वळणा चा होता कि मुलाला थोपटून अंगाई गावी तशी मंद झोप यायला लागली ५ तस सतत प्रवास करून थकलो होतो...पण निसर्ग ग्रीन गोल्ड .....जरासा लुमिनास गोल्ड
ब्रेक जबाब द्यायला लागले होते ...वासोळे फाट्यावरून निघालो १० कि मी ..पुढच्या गावात बांधून विचारल भजन चालल होत ...अंडी आहेत का? ..नाही...जहाल व्हेज उत्तर आल पुढ पुन्हा पुढ ची वाट धरून आंबेवाडी ला पोचलो ..माझ्या जवळ गावकरी अडवून अवाच्या सवा पैसे मागतात हि त्यांची अप कीर्ती आली होती....लगेचच काही बाया समोर आल्या तुम्हाला कुठ जायचं आहे ..मदनगड ..त्यांच्यातल्या एका पुरुषाला आमच्या बरोबर जायला सांगायला लागल्या ....पुरुष कशाला एखाद्या मुलां /मुलीन /बाईन रस्ता दाखवला असता तरी चालाल असत.....त्या माणसाला विचारल येत का तुम्ही तर म्हणे मला गुर चाराय्चेत ...तिथ १५० रु मजुरी मिळते..आम्ही दुप्पट देतो ...किती पैसे घेणार ? तुम्ही किती देणार?त्याचा उलट प्रशन ..अरे आम्ही ३ जन ....तूम्ही पुढ जावून तिथ मुलांना विचार...पैसे पण तेच सांगतील ..गाड्या पण तिथच लावा .मध्ये चंदू-बंधू उतरले .लाढू देत....पुढ गेलो तर ३-४ पोर दिसली एम पी ३ वर मोठ्यान गाणी लावून गुर राखत होती ....
त्यांना विचारल मदनगड ला जायचं आहे फक्त मदन...किती घेणार १०-१५ जणांचा ग्रुप असता तर १००० घेतले असते पण तुमचे फक्त ३ जन ......मग ?......तुम्हीच सांगा ..बोलू लागले मी पुढ गेलो एका गुर चार नारयाशी बोललो ..त्याला म्हणल तुम्ही आम्हाला वाट दाखवणार का? तो म्हणाला आम्ह हि कष्टाची काम करत नाही म्हनंलो तुमच्या या मुलाला पाठवा तर म्हणे त्याला ते काम झेपणार नाही....
तेव्हड्यात चंदू बंधू परत आले .तावातच ..चला ...काय? ...मी विचारलाय सगळ ..आपण शोधात शोधात जाऊ .....हे याचं नेहमीच नाटक .जीवधन ला पण ..जाऊ पण किती वेळ लागणार आताच २ वाजले होते..पण तिथ पण चंदून ओळख काढली होती ..बिनकामाची..त्यातल्या एका पोराला माझ्या गाडीवर बसवलं आणि निघालो वाटाड्या मिळाला नाही पोर हाटून बसली होती..."एकदम कोन्फीडनट "' अजिबात बार्गेन करत नव्हती.....गाडीवर माग बसलेल्या पोराला म्हणालो .तू येतो का ..ते पैसे तुला देतो किती देणार .. २०० रुपये ..मग तव्हाच बोलायचं ..गाडी वळवली २००- नाही ३००--- २५० नाही जमणार ३००
अरे त्या पायर्या जिथून सुरु होतात तिथून तू परत जा तिथ पर्यंत दाखव .....नाही तू कड्यावर येवू नको ...
ठीक आहे ३०० रुपये पण जो ४० फुटी कडा आहे तिथ पर्यंत तुला आल पाहिजे ...हो हो ......निघालो तो जरा घा ई करायला लागला ...गाड्या एका खोपटा समोर ठेवल्या
मी फोटो काढत होतो अचानक त्या गाईड ने शेताच्या बा धन न्यायला सुरुवात केली ..मला कळा ल कि येतान हि वाट सापडू शकत नाही...मी त्याला नीट ने म्हणू लागलो तो गप्पच...वाटेत २ ओढे लागले बारीक पाऊस ..कँमेरा जपायचा होता..
जंगलात शिरताना त्यान तोंडात तंबाखूचा बार ठोकला .....निघालो जंगल एकदम दाट रस्ते ..गुरांच्या पायवाटा ...मनसोक्त कान्फुजन ..ते पु ढ जायला लागले मी म्हणले दादा मला तुझा स्पीड झेपत नाही, बर का रे जरा हळू चाल ....वाटेत शेजारी एक साप दबा धरून बसलेला .( म्हणजे ती स्प्रिंग सारखी रचना समोर सावज दिसलं कि झे प घेतली .बा रका होता पण डीस्काव्हारीव र बघतो तसा ..मी फोटो काढला ..बंधू म्हणे मी त्याला काठीने उचलतो...हा कधी कधी जास्त हुशारी करतो ....मी रागावलो ..जोरात सांगितलं अस काही करायचं ना ही ...त्याला त्याच्या जागी असुदेत ...त्याच जे काम चालली ते करूदेत..निघालो त्याला म्हणल तुला माहिती आहे का तो कसला साप होता ...नाही मी डीस्काव्हारी ला पाहिलंय ...मी मनातल्या मनात डोक्याला हात लावला या भाऊ ला तो विषारी आहे कि बिनविषांरी हेच माहिती नव्हत....जड..जास्त हुशारी अशी अंगाशी येते....( शासन एव्हडा खर्च करत ...सापांवर अतिशय स्वस्त ग्रंथ काढू शकत नाही का?---भडवे चोर आहेत ...त्यांच्या नोकर्या त्यांना प्यारया आहेत .त्यांना वाटत कि लोकांवर आम्ही उपकार करतो ..त्यांना सुख सोई देवून ...वन खात्याची अशी पुस्तिका नाही ....गरजच वाटत नाही ..कारण ते इंग्रज इथून गेले शरीरान ते आपल्या डोक्यात आपल्या लोकांना तुच्छ लेखण्याची भावानेच बीज रोवून गेले...किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी तो भडवा तहसीलदार सगळी मदत गोदामात ठेवत होता आणि इकड लोकांना खायला नव्हत आणि कार्यकर्त्यांना पण ...
अचानक आम्ही एका उघड्या भागापाशी आलो .....जपून चला ..माझा २५०० चा बूट खालून झिजला होता माझी चूक बदलला पाहिजे होता..तो फाटत नाही उसवत नाही झिजत पण नाही ...पावसान ओला झाला होता....आता आम्ही एका नदीच्या प्रवाहात शिरलो ...तिथून परत शेजारून वरती चालू लागलो ...पाय वाट पार करताना कसलीही ओळखीची खूण ठेवता आली नाही...पुन्हा दुसरा उघडा खडक वरती उंच मदन्गादाची खिंड दिसत होती
आणि आमच्या वाटाड्याला साक्षात्कार झाला ...साहेब आम्हाला सुतक येईल कारण आता मी २ साप बघितले ...त्यान आम्हाला खरच खिंडीत गाठल ...मी त्याची भीती समजू शकत होतो..त्याला सांगितलं कि माझ्यावर विश्वास ठेव ..तुला दिलेलं काम बरोबर कर ...
तो म्हणे इथच आणून सोडायचं ठरल होत..( ताण आला कि भली भली लोक आपले आणि बाहेरचे बिनधास्त खोट बोलतात ).मी ठणकावल ..नाही तू तो कडा जिथून सुरु होतो तिथ पर्यंत पोचवणार होतास ...आणि तुला माहिती आहेका तो मधला आडवा १० फुटाचा पँ च ..तो म्हणतो आता काय राहिलंय तुम्ही तो सहज पार पाडा ल .टू त्या कड्याच्या खालच्या भागापर्यंत यायचं ठरवल होतास ..त्याचे पैसे ठरले होते.आता त्याला कळाल कि मला बरीच माहिती आहे ..मग नरम पडला ..पण मी येणार नाही ..चंदून शेपूट टाकल (तो भाडू काहीतर निशित बचाकाला असणार ...त्या शिवाय असा अचा नाक कसा हा माघार घेतोय ..आणि ते दोघ अगोदर पुढ बोलत गेले होते,,,असो ..मला म्हणे तुम्हीच ठरवा )
मी त्याला चुचकारल ..तू आम्हांला त्या खिंडी पर्यंत ने ..नाहीच...वरती पावसाची चिन्ह जोरात होती धुक दाटून आल होत..( कदाचित त्याला कळल कि परतायला उशीर होईल त्यापेक्षा इथूनच परत फिरा..)..ठीक आहे चाल पुढ जरा आणखीन स्पस्ट वाट दाखव ..तो तयार झाला ......निघालो पुढच्या टर्न ला म्हणाला आता मी निघतो...चंदू म्हणे जे होईल ते द्या ..बर ...मी त्याला विचारल किती ..द्यायचे ..तो म्हणाला जे ठरलाय ते ...
मी १०० देतो ..अस कस ..इथपर्यंत आणलाय कि ? अरे तू आम्हाला वाटेत अर्धवट सोडून चाललायस ...येताना कस उतरायचं हे माहिती नाही ......त्याच म्हणन कि मी त्याला सगळे पैसे द्यावेत,,मी १५० देतो ...१०० दिले ..५० ते मी तुला उतरल्यावर देतो ...आताच देवून टाका ना ?..तुला उतरल्यावर देतो (मला द्यायचे होते ..पण सुटे नव्हते..)तो निघून गेला ..आम्ही वरची वाट धरली ..(तो खरच भिला असेल तर देवान त्याला स्वतःच रक्षण करायची बुद्धी द्यावी )
बंधू पाय घसरून आपटला ...पाठीवर बाग होती त्यामुळ वाचला मी त्याला माझी पण बाग दिली होती ..माझा स्पीड कमी झाला होता ..हृदय खुप फास्ट चालल होत ...त्याचा रेट खाली आला पाहिजे हे कळत होत ...प्रथम मी त्याच्या बरोबर विलंबित लय ..त्याचे ४ ठोके बरोबर माझा एक ठोका मोजायला सुरुवात केली .....काही काळान काय माहिती काय झाल पण ते धड धड नॉर्मल झाली ...नदीची वाट पाऊस ..तो वरती जास्त झाला तर पूर येणार ..ओके च काम. जिथ वाट उंच दगडान अडली तिथ साईड कारवी मोडून वाट करायची चंदू लवकर वरती जावून बसला वरती दगडाच्या एका खोबणीत ..इथ वाट शोधात होतो ...सापडली नाही ...अरे साईड ने आहे, उतर खाली ..धुकं भरमसाठ पाण्याच्या लाटेसारख वरखाली होत होत ..साईड ने निघालो
मदनगड डाव्या बाजूला ठेवून निघालो ...मनात खुप प्रश्न होते ..आपण आलोय आंबेगाव च्या बाजून ...समजा दुसऱ्या बाजूने आलो तर उद्धवने गावातून वरती याव लागल असत ....आणि सीन वेगळाच असता .सगळीकडे धुक पाउस ...पण अंदाज करायला सगळाच सारख दिसत होत ..पण निघालो ..चंदू म्हणे सापडल्या पायऱ्या..त्याची ती नजर जरा छांन आहे,...पायऱ्या चढून तो वरती निघाला .एस...... तेच ते केक मध्ये कापलेल्या पायऱ्या ...मी एकदाच खाली पाहिलं आणि ठरवल कि इथ जर गोरक्ष गडासारख झाल तर ....माझ आव्ह्गड होईल ....फक्त ३ पायऱ्या पुढच बघत होतो..दगडाला चिकटून चाललो ..पायऱ्या रुंद आहेत पण बाहेरच्या बाजूला कळलेल्या आहेत .आणि त्यात शेवाळ लेल्या ...भीती वाटत होती ..गरगरायला व्हायची ...मी निसर्गाला शरण गेलो त्या दगडातून ताकद घेतली तो माझा शत्रू नव्हता ..मित्रच होता..
अचानक तू आठवलीस खोडसाळपणे हसायला लागलीस मी पण मंद स्मित केल ..हो कारण माझी खरच टरकली होती ते गरगरायला लागल कि मग मला काही सुचत नाही आणि मग मधेच जागेवर बसायचं ..बरोबर नव्हत ..४ वाजले होते ..वेळ कमी होता...तुला म्हणालो बघ ना खरच घाबरलोय ..तुझ्याशी गप्पा मारत एक एक पायरी चढायला लागलो ...मी सरळ चढू शकलो असतो ...पण तो गेम झाला असता ..मी राज ला शब्द दिला होता मी कसलाही स्टंट करणार नाही ..स्वतः: होवून कसलाही धोका घेणार नाही ..मला स्वतः ला तिथ त्या जगात परत न्या य च होत..अर्रेच्या पण जादूच झाली ..तू आता बाहेर नाहीसच तू आतच आहेस ..बघ ना कसलं खोल आहे ...४००० फुट ती गाव कशी खेळण्यातली सारखी दिसताहेत ...ओके चल पुढ तू म्हणालीस ...आता मला तुझा कसलाच त्रास नाही मि तू आणि तू मीच आहे ...
||जय महाकाल||...दुसर काय म्हणायचं ....||.जय महाकाल ||
चढलो वरती ...आणि उजवीकडे वळलो तर चंदू दिसेना ....बंधू ला म्हणल कुठ आहे हा क मार ...तर ओ नाही जरा पुढ गेलो ..तर तो लीप ऑफ फेत चा ५ - १० फुट रुंद ट्राव्हर्स. असा कि सटकला तर गेलात ...विचारच करायचा नाही...दगडाला चिंकटून पुढ जायचं बंधू पुढ गेला ..बँग ठ्ठेवून आला ..मी त्याच्याकडे बँग दिली कँमेरा माझ्याकडे होता ..पण शुटींग चा विचारच आला नाही....दोघाही पलीकडे गेलो वरती सुंदर निळी फुले जांभळी फुले ओळीत लावल्या सारखी. उगवली होती जणू तोरणच बांधलाय...या या स्वागत आहे तुमच ..म्हणतोय हा गड..
राज न सांगितलं होत कि " आता सौंदर्य पाहायला लागा ..."खरच त्यामुळ त्या कड्याची भीषणता कमी झाली एखाद्या काळा कुट्ट रामोशी ..च्या गालावर पावडर ..लिपस्टिक लावून त्याच रौद्र रूप कमी केल्या सारख ....
अचानक वरून चंदूचा आवाज आला ...पठ्या वर निम्यात चढला होता नुसता दोर न लावता...दोर लावून बघत होता ...तिथल्या एका पहारीच्या टोकाला दोर लावून उभा राहिला नंतर त्याच्या शेजारी एक खिळा मारला होता त्यावर दोर टाकता येत नव्हता..पण नंतर अडकवला आणि त्याचा आधार घेवून डाव्या बाजूला सरकला .....तिथून पटकन वर जायचं तर म्हणे तुमच्या बँग द्या .....अरे बाबा ..तू अगोदर वर चढ ..वरती दोर बांधायला एक जागा केलीय .(नेट वर पाहिलं होत).....एखादा फुट वर चढला असेल कि लगेच त्याला ती दिसली . तिथ त्यान दोर बांधला ..आणि बँ ग वर घेतल्या ...मि विचार केला आपल्याला सरळ चढाव लागेल दोर न घेता खुप आव्ह्गड ...शरीर साथ देत नाही. बोट टेकवायला पण जागा नाही .दोराला हात लावला तर तो दोर प्लास्तीक्चा होता ताणला गेला आणि मी ठेवलेला पाय पण सरकायला लागला ..म्हणून सोक्स काढले तर पाय अजून जोरात घसरले...पुन्हा सोक्स घातले आता पाय घसरत नव्हते..
बंधूला म्हनला मला जरा प्रोब्लेम आहे ...तो घाबरला ..ओके ठीक आहे तुला चढायच नसेल तर परत निघुयात ...मला विश्वास येत नव्हता ...माझा विश्वास हि एक गोस्ट ..कड्याचा विश्वास हि दुंसरी....आणि मी कधीही मागच्या आयुष्यात आं कडा चढलो नव्हतो ..मला हे काळात होत कि आपण करतोय ते जास्त प्रोफेशनल नाही.
पण मी विचार केला ..परत म्हणजे पुन्हा डोक्यात ढोल वाजनार ..मदनगड करायचा राहिला आहे..पुन्हा खोबणीत पाय ठेवूनवर निघालो ..मी माझ्या उभ्या आयुष्यात असा कधी चढलो नव्हतो ...छाती कड्याला लावून वर चढायच ..९० डिग्री खोबणीत ..बोट घालाय्च्ची पाय गुंतवायचे ...त्या बरोबर पाठीमाग तोल जावू द्यायचा नाही. पडल कि २-३ हजार फुटाची घसरगुंडी...
पहिले ५ फुट चढलो आणि लगेच वेग धरला ..मला माहिती होत कि मी एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबलो कि पाय हात अवघड नार ...हात दोराभोवती गुंडाळ ले ..३ वेढे ...तोच दोर कमरे भोवती ...बंधू म्हणत होता कि दोराचा आधार घ्यायचा त्याला लटकायचं नाही ..त्याच बरोबर होत ...पण मला दगडाला चीकटायचं तर कस हेच कळत नव्हत ..भीती होती नंतर त्याच काळजीत रुपांतर केल ...शोधायला लागलो तर खुप खाचा सापडल्या ते इंस्टनन्त शिकवण होती.डायरेक्ट ट्रेनिंग डाउनलोड झाल.(.माट्रीक्स आठवतो ..ते हेली कॉप्तर चा ट्रेनिग.).. वरच्या खिळ्या पर्यंत गेलो त्यावर उभा राहिलो तर चांगला रेस्ट होता तिथून वरती जिथ दोर अडकवला होता तिथ वरती जायला प्रश्न आला .तर त्यावरच पाय दुमडून ठेवला आणि वर आलो...( जाताना बिर्ला व्हाईट सिमेंट नेल होत ...जिथ पाय ठेवौच्या जागा आहेत तिथ ते लावायचं होत )
मदनगड चढला .....नंतर बंधू पण वर आला ...संध्या काळचे ६ वाजत होते....चंदू म्हणाला अंधार पडायच्या आत परत जायचं आहे ...मला माहिती होत आता वरती धुक्यात काही बघता येणार नाही...थोड हिंडलो पुढ चालता चालता माती पायवाट धासायला लागली आणि परत उतरायला सुरुवात केली ..खूपच थकलो होतो...उतरताना बंधू न शुटिंग केल ...आता तातडीन आवरायला घेतलं
सकाळपासून २ वडापाव वर होतो ...मी जेवणाला १ चपाती खातो ..त्यामुळ मला त्याचा त्रास झाला नाही...पण फक्त ब्रेड होते...तेल अंडी मिळाली नाही शेवट पर्यंत..कोंबड्या खुडूक झाल्या होत्या काय ...सगळ्यांच्या
पुन्हा तो लीप ऑफ फेत चा पँ च ,,,उतरताना पण खाली पाहिलं नाही ...तो कालावनतीनिच्या गडाचा अनुभव हाताशी होता...
खाली उतरलो शेवटच्या पायरीवर डोक ठेवलं .....या गडा न मला जो अनुभव दिला ..त्याबद्दल मी त्याचे आभार मानले ..जस लहान मुल बापाच्या अंग खांद्यावर खेळावं ..आणि त्याच्या बिन न्धास्त पनाची काळजी बापान घ्यावी ..आणि त्या लहान मुलाला त्याची जाणीवच नसावी ..अस आपल असत ..मी केल...
हि सगळी एक माया आहे ..माया जाल ..जाळ आहे त्यात आपण अडकलो आहोत ..आपले इगो ..डर..सुख काही निर्माण केलेलं काही निर्माण झालेलं ...मुळात आपल्याजवळ आपल अस काय आहे तेच शेवट पर्यंत आपल बाकी सगळ हा भास आहे या मायावी दुनियेचा .आपण इच्छा करतो आणि आणि मग त्या इछेचे गुलाम होतो ..आणि मग ती इच्छा संपली तर काय?याचा डर आपला जीवनभर पाठलाग करत राहतो...मी पण इगो तो पाठलाग सोडून देवू शकत नाही...आणि आपण एका राहत गाडग्याचा भाग झालो आहोत हेच विसरायला होत...( च्या आयला हे राहत गाडग्याच पाही निशित कोण पितय ..कुणी आपल्याला कामाला लावलाय ? काय मेदू आहे ना त्या गेम रचनारयाचा ?)
मी आभार मानले..गडाचे ..||जय महाकाल||
हे निसर्गच रौद्र रूप मला तुझ्याशिवाय कोण दाखवू शकल असत हे शंकरा ....आणि त्याचा प्रेमळ पणा कुणी मला समजावून दिला असता तो कातळ मला कधीच टोचला नाही थोड्याश्या कठीण गादीसारखा होता....
पुन्हा खिंडीत ...बंधू म्हणे इथूनच आलो होतो का रे ....हो लवकर चालल्याला पाहिजे मी बूट काढून टाकले सोक्स वर उतरायला लागलो ..पुन्हा त्या नदीतून आगळ्या गोट्यांनी पायाच्या तळव्यांना अक्यू प्रेषर केल...४-५ वेळा पडलो एकदा तर पडल्यावर उठलोच नाही कंटाळा आला बसून राहिलो ...डावा गुढगा दुखायला लागला .पाय टाकला कि वेदना ..अचानक मंनका कळ आल्या सारखा दुखला ...अरे बापरे ..घाबरलो..( तुम्ही चांगले असता पण हलला कि दुखत इतक असत कि समोर वाघ आला तरी पळायचा विचार येणार नाही..)
चंदू म्हणे लवकर चला ...अंधार पडायच्या आत खाली पोचायला हव ...हे तो ६-१ ५ ला सांगतोय शेवटी नदी संपली अनेकदा चुकीचे मार्ग निवडता निवडता वाचलो ..चंदू म्हणे कि बोलत उतरू ....म्हणजे वेळ जाईल ..मी म्हणल अरे तस नाही ..नेह मीचा रास्ता असेल तर ठीक आ हे ...इथ ते चुकण परवडणार नाही ७-३० झाले ..
परत जंगल लागल नदी संपली पावसामुळ नदीचा पाणी वाढल होत..मी बूट घातले आणि झाप झाप उतरायला लागलो ..मी म्हनला बँ टरी लावायची का? तर म्हणे कि नको ....भ्रम होतात आणि रस्ता चुकायचे चान्स जास्त..मला पण ते योग्य वाटल जो पर्यंत दिसतय तिथपर्यंत तसाच जावू....
जाताना जी चिन्ह दिसली होती त्याची ओळख पटवत निघालो ...तो एक कलेकटीव इंटेलिजन्स होता .. शेवटी त्या ओढया चा आवाज आला ...किती पाणी असेल काय माहिती ..आता बँ टरी काढली ...जाताना त्या मुलां न सरळ वाटेन न नेता कुठून तरी शेतातून नेल ..आमच्यकडे पावरफुल बँ टरी होत्या ..पण मार्गाच सापडत नव्हता ..मी ढकलल्या सारखा चालत होतो...
चंदू व बंधू सापडेल तो मार्ग काढत होते.....शेवटी मी त्यांना थांबवल आणि जाताना आपल्याला हा डोंगर लागला होता तो ओलांडायचा नाही एव्हड बघ अस म्हनालो ...
८ वाजले ..गाड्या घेतली ..मी गाडीत पेट्रोल कमी भरल होत ..जाताना गाडी बंद पडणार हे निशित होत...मी नीट विचार करून पेट्रो ल भरल नाही ..त्याचा ..आता प्रशन उभा राहिला ...अचानक पुढ च्या गावात एका दुकानात विचारलं पेट्रोल आहेका ?> तो नाही म्हणाला ..मी म्हणालो तुझा काय रेट असेल तो देतो .प्लीज जेव्हड असेल तेव्हड दे...तर म्हणे किती लिटर हवाय...२ लिटर ...कारण खराब असे ल तर जास्ती खराबी नको....
नि घालो ....भंडारदरा पास ...संगमनेर ची पाटी लागली .....पुन्हा रस्त्याच्या खुणा ...चेक करत प्रचंड पाउस ...मग तो दादाचा तीकोनाला घेतलेला प्लास्तीक चा कागद का मी आला त्यातून बंधूच डोक बाहेर काढाल. रेडी रेनकोट
पुढ राजूर कोतूळ ब्राम्हणवाडा ..चंदू कोतूळ ला प्रचंड पाउस होता सरळ पुढ घुसला आम्ही त्याच्या पाठीमाग ..मी बंधूला म्हणालो कि अरे हा असा कसा घुसला ...रस्ता चुकला वाटत ...पुढ गेल्यावर त्याला थांबवला ..तर म्हणे मी थांबणारच होतो...परत मागच्या च्व्कात आलो ..कपडे काढून पिळले ..दुपारी दोन पासून ओले होते..
पुढे पाउस संपला आणि चंद्र उगवला ...अरे वा पौर्णिमा होती ...खुप चं वातावरण .चान होत.....पुढ एक हॉटेलात जेवलो मला गाडीवर तांग टाकता येत नव्हती सगळ अंग दुखत होत...अन्दर्वेअर सकट सगळ ओळ झाल होत .....पुढ रस्त्याशेजारी गाड्या थांबवल्या आणि शेकोटी केली बाभळीचे काटे लगेच पेटतात ..शेकलो बूट वाळवले ...तेव्हड्यात पोलीस आले ...त्यांना सांगितलं कि आम्ही मदन्गाडला गेलो होतो ..पूर्ण भिजलोय त्यामुळ शेकोटी केलीय...सोडलं
मध्ये आळेफाटा नारायण गाव ...तिथ गरम दुध घेतलं रात्रीचे ४ वाजले ..बंधून जरा झोप काढली मी पण पेंगलो
मी रात्री गाडी चालवत नाही ..आणि वेगात तर नाहीच नाही चंदू म्हणे त्याला सकाळी मुलाला शाळेत सोडायला जाव लागत म्हणून लवकर निघू ...निघालो ..वाटेत गाडी स्किड झाली मी गाडीवरून खाली ढू नग नावर गोल फिरलो आणि आपटलो पूर्ण चिखलात ..लागल नाही मी त्याच्या कडून गाडी घेतली ..पण मग माझेही डोळे झाकायला लागले....
आणि गाडी फुर फुर करायला लागली शेजारी पेट्रोल पंप ..मी त्य दोघांना पुढ व्हायला सांगितलं पंपावर गेलो .कळा ल कि ६ वाजता पंप सुरु होणार समोर गाडी लावली आणि एका कोपऱ्यात झोपून गेलो ...६-३० ला उठलो पेट्रोल भरल पुण्यात आलो
आरशात पाहिलं तोंड एकदम काळ पडल होय..
पण समाधान कि मदनगड ला जावून आलो
जीपीएस घेवून एकदा त्राकिंग करायचं आणि ती फाईल गुगल वर लोड करायची १० मीटर मध्ये तुमचा रस्ता बरोरोबर असतो शिवाय असा रस्ता ताखाव्णारा मोबाईल ५००० रुपयांना मिळतो.....त्यावर हि फाईल पुन्हा लोड करता येते ...आणि तम्ही एखाद्या वाटाड्या शिवाय पुढ जावू शकता.....यांना कस काळात नाही कि जसे जेव्हडे लोक जास्त येतील तस इन्कॅम वाढत जाईल ..अध्या फक्त गुरच वळतात ...पटकन पैसे मिळाले पाहिजेत..यावर विश्वास आहे..गडावर ठोकलेले खिले तोडून टाकतात ..आव्ह्गड परीस्तीती कायम ठेवतात .....
अस काही ट्रेकर्स ची पण दुखते ....त्याचं अस म्हणन आहे कि तिथ जान सोप राहू नये ..अवघडच असाव ...हे मूर्ख लोक पण रस्ता अवघड करून ठेवत असतील ....मी सांगतो नीट देव्हालाप केला तर हे मोठ मार्केटिंग ...हि जागा भविष्यात जबरदस्त होईल ....तिथून दिसणारा नजरा लोकांना दाखवायचे ५००० मिळतील .......
कोण समजून सांगणार .......कोण समजणार ...
Labels:
alang madan kulang,
madangad,
trek
Location:
State Highway 44, Maharashtra, India
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment